पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८१ ) लोक आपली कामें लबाडी, आर्जव, किंवा खुशामत इत्यादि निंद्य मार्गाच्या अवलंबनाने करून घेतात. अशांच्या अंगी असलेले थोडेबहुत गुणसुद्धा स्वावलंबनाच्या अभावी कवडीमोल ठरतात. असे लोक ज्या समाजांत अगर देशांत असतात तो देश व तो समाज दुर्दैवीच समजला पाहिजे. कित्येकांना आपली कामें स्वतः करण्यास लाज वाटते, म्हणून ते ती कामें नोकराचाकरांकडून करवितात, पण } स्वतःची कामे स्वतः करण्यांत लाज कसली आली आहे लाज वाटलीच तर ती स्वतःच्या क्षुल्लल कामासाठी दुस याच्या तोंडाकडे पाहण्यांत किंवा दुसन्यावर अवलंबून राहण्यांत आहे. जी कामें स्वतःला करता येण्यासारखी आहेत त्यासाठी दुस-याची मदत घेणे म्हणजे स्वतःचा दुर्बलपणा जाहीर करण्यासारखेच आहे. सुधारलेल्या राष्ट्रांतील शेतकरी सुद्धा आपल्या नाशिबावर हवाला देऊन पावसाकडे डोळे लावून स्वस्थ बसत नाहींत. कारण ते पक्के स्वावलंबी असतात. ते एकजुटीनें नदी, नाले, व ओढे यांना धरणे वगैरे बांधून अशा प्रत्येक । ईश्वर निर्मंत साधनांचा आपल्या शेतकीकडे पूर्ण उपयोग करून घेतात. आपल्या पिकांच्या वाढीसाठी ते नानात-हेचे रासायानिक पदार्थ उपयोगांत आणितात. पिकाला कीड लागली म्हणजे कीड नाशक रासायनिक द्रव्याने ते सर्व पिकांना स्नान घालतात. त्यामुळे सर्व कीड मरून जाते. थंडीच्या दिवसांत जेव्हां धुक्याची भीति असते तेव्हां ते शेतांत विस्तव पेटवून पुष्कळ धूर करितात. तो धूर वर