पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८० ) समजणे हे अगदी चुकीचे आहे. आपले स्वतःकरितां च दुस-याच्या नडीआडीकारतां वाटेल तितकें हलके काम करण्यास प्रसंगोपात प्रत्येकाने तयार असले पाहिजे, याचा । अर्थ इतकाच समजावयाचा की, मनुष्याने मजुर हाणें हें कांहीं त्याचे ध्येय नव्हे. पण हलकीं सालकी श्रमाची कामे करण्याचा त्याला अभ्यास असला पाहिजे. कारण त्यापासून मनुष्य तरतरीत, चलाख, डौलदार व मजबूत होतो. इंग्लंड, अमेरिका, जपान वगैरे सुधारलेले राष्ट्रांत कांहीं सुशिक्षित मोठमोठे धनवान् लोकसुद्धा आपल्या मुलांना गिरण्या, गोदी वगैरे सारख्या कारखान्यांत काम करण्याला पाठवितात. व ती मुलेही कांहीं काळपर्यंत सदर कारखान्यांत व गिरण्यांत साधारण मजुरांप्रमाणे मोठ्या आनंदानं काम करतात. लहानपणापासूनच अशी कामे करण्याचा सराव असला म्हणजे पुढे कितीही कठीण काम पडले तरी मनुष्य घाबरत नाहीं, व तसा सराव नसला म्हणजे पुढे मनुष्याचे पदोपदीं फार नडते. स्वावलंबी लोक कितीही बिकट काम पडले तरी डगमगत नाहींत. त्यांच्या ठिकाणी पूर्ण आत्मावश्वास असते. ते आपले सर्व काम सुरळीत व धिमेपणाने करीत असतात. ते थोड्याशा साधनाने सुद्धा मोठमोठी कामें सहज उरकतात. त्यांच्या अंगांतील सर्व गुणांचा पूर्ण विकास होतो. ते आपली सर्व कामे सरळ मार्गानें कारतात, त्यांना असत्य व लांडीलबाडी अगदी खपत नाही, दुसन्यावर अवलंबून राहणारे लोकांचे विचार फार संकुचित असतात, त्यांना फारशी महत्त्वाकांक्षा नसते, असे