पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७९ ) राहातात. फारच झाले तर अशा आईबापांचीं कांहीं मुले भिक्षांदीचे अवलंबन करून कसे तरी थोडेबहुत शिक्षण संपादन करतात. परंतु अशा त-हने शिक्षण संपादणे हा कांहीं स्वावलंबनाचा खरा मार्ग नव्हे. स्वावलंबनाचा खरा मार्ग म्हटला म्हणजे आपल्या स्वतःच्या बाहुबलावर कांहीं तरी उद्योगधंदा करून विद्याभ्यासाकारतां पैसे कमावून शिक्षण संपादन करणे हा प्रशस्त मार्ग होय. इंग्लंड, अमेरिका, जपान वगैरे सुधारलेले राष्ट्रांतील विद्यार्थी आपल्या आईबापांची मदत न घेतां आपल्या स्वतःच्या कर्तबगारीवर आपला विद्याभ्यास तडीस नेतात. ते स्वतः, छापखाने, गिरण्या, शेते, खाणावळी वगैरे कारखान्यांत कामधंदा करून पैसे मिळवून विद्या संपादन करितात. प्रसंग विशेषीं श्रीमंत लोकांच्या घरी भांडी घासणे, दिवाबत्ती करणे, भिंती सारवणे, झाडलोट करणे यांसारखीं , हलकीं सालकी कामें पतकरून सुद्धा ज्ञानार्जनासाठी ते द्रव्य संपादन करितात, चाडवाडलांच्या कमाईवर अवलंबून न राहतां आपण स्वतः कांहों तरी मिळविले पाहिजे अशी त्यांची ठाम समजूत असते. स्वावलंबनाने जे कोणी विद्याभ्यास करितात त्यांना तिकडे सुशाक्षत लोक फार चाहातात, व सर्व ठिकाणी त्यांचा गौरव होतो. म्हणून कित्येक कोटयाधिशांचे मुलगे सुद्धा तिकडे या रीतीने पैसे मिळवून विद्या संपादन करतात. कारण आपण स्वतः काम करणे हे हलकें व कमी दर्जाचे आहे अशी त्यांची समजूत नसते. | हलके काम करणा-या लोकांचा दर्जा कमी असतो असे