पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ( ७८ ) परावलंबी होतो. कारण लोकांचे सहाय्य वारंवार घेतल्याने आपल्या उद्योगावरील व कर्तबगारीवरील आपला भरंवसा उडतो; व आपल्याच हिमतीवर आपण आपले कार्य तडीस नेऊ असा भरंवसा आपणांस वाटत नाहीं; व असे आपणांस एकदां वाटू लागले म्हणजे आपण वारंवार दुसप्याची मदत मागू लागतो. असे नेहमी केल्याने आपण निर्बल होत जाते. पण स्वत:वर भरंवसा असला म्हणजे असे होत नाहीं. जो विद्यार्थी आपल प्रश्न स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही, त्याची बुद्धि वाढत नाहीं. ती तशीच अपरिपक्क राहाते. त्याला आत्मविश्वास नसतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपले प्रश्न आपण स्वत:च सोडविण्याची खटपट प्रथम करावी; म्हणजे बुद्धि वाढून प्रत्येक विषयांत त्याची दिवसेंदिवस प्रगति होत जाईल. मनाला एकदा दुस-यापासून मदत घेण्याची खोड लागली म्हणजे त्याचे स्वावलंबन अगदी सुटते. अभ्यासांत घडाघडी अडचणी येणार, तेव्हा प्रत्येक घटकेस सल्ला देण्यास गुरु कोठून भेटणार ? त्याचप्रमाणे आपले विद्याभ्यासाचे खर्चाचा भार होता होईल तो दुस-यावर पडू देऊ नये. आपल्या या देशांतील बहुतेक विद्यार्थी आपल्या आईबापांवर अगर आप्तेष्टावर अवलंबून राहून विद्याभ्यास करतात. एखाद्या वर्षी त्यांना खर्चाला पैसे आईबापांकडून आले नाहीत कीं, त्यांचा अभ्यास बंद होतो. ज्या आईबापांना मुलांना शिक्षण देण्याचे सामर्थ्य नसते त्यांची मुलें अशिक्षितच