पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७७ ) ( १० ) स्वावलंबन

      • यद्यत्परवशं कर्म तत्तद्यत्नेन वर्जयेत् । यद्यदात्मवशं तु स्यात् तत्तसेवेत यत्नतः ।। सर्व परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम् ।।

मनु. भावार्थः-दुस-यावर अवलंबून कोणत्याही कमी राहूं नये, आपल्या हिमतीच्या जोरावर नेहमीं कार्य करीत असावे. कारण परावलंबन हे दुःख व स्वावलंबन हे सुख असे ( मनुने ) म्हटले आहे. | स्वावलंबन म्हणजे आपण आपल्या स्वतःवर अवलंबून | राहणे, आपली, समाजाची, व देशाची उन्नत यांसारखीं। महकायें सिद्धीस नेण्यास स्वावलंबनासारखा दुसरा मित्र नाहीं. स्वावलंबनानें आपलें शारीरिक, मानसिक अध्यात्मिक बल वाढते, जे कोणी आपल्या कामाकरिता दुसन्यावर अवलंबून राहतात, ते भित्रे व मनाने दुर्बल होतात. म्हणून प्रत्येकाने स्वावलंबी होण्याचा प्रयत्न लहानपणापासूनच केला पाहिजे. स्वत:च्या क्षुल्लक कामाकरितां सुद्धां दुस-याच्या तोंडाकडे पाहण्याचा प्रसंग येणे यासारखी लाजिरवाणी दुसरी कोणतीही गोष्ट नाहीं. स्वावलंबनाच्या योगानें कोणाही मनुष्यास आपला चरितार्थ स्वतःच्या श्रमाने चालविता येतो. दुस-यावर अवलंबून राहून त्यांचे सहाय्य घेण्याची आपणांस एकदां संवय लागली म्हणजे आपण निःशक्त व