पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७६ ) सहनशील राजा.

  • ०* फिलीप म्हणून एक राजा होता. त्याच्याकडे अथेन्स शहरच्या राजाकडून तह करण्याचे इराद्याने कांहीं वकील

आले. त्यांची व राजाची तहासंबंधाने बराच वेळ वाटाघाट | झाली. परंतु तह होण्याचे दिसेना. तेव्हां फिलीप राजा | कंटाळून उठला व उठतां उठतां त्या वकिलांस म्हणाला 44 आपले कांहीं काम असेल तर सांगा. मी ते आनंदाने करीन.यावर त्या वकिलांनी चिडून उत्तर दिले ६ महाराज, जर आपण या वेळी आत्महत्या कराल तर फार बरे होईल, हे त्यांचे भाषण ऐकून फिलिफ राजाचे सरदार लोक अगदी खवळून गेले व त्या वकिलांचे पारिपत्य करण्यासाठी राजाच्या हुकुमाची वाट पाहू लागले. परंतु त्या सहनशील राजाने त्या वकिलांस उत्तर दिलें कीं, जा आणि आपल्या राजास सांगा की, ** जे कोणी उर्मटपणाचे आणि अपमानाचे शब्द ऐकून घेऊन क्षमा करितात ते, असे शब्द बोलणान्यांपेक्षा, शांतता राखण्यास अधिक पात्र असतात.