पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७५ ) लेल्या जड पाट्या डोकीवर घेऊन शहरांत गेल्या. जातांना वाटेंत भिमा वरचेवर कण्हूं, कुंथू, व पुट पुटू लागली; परंतु चिमा तिची थट्टा करून हंसू लागली. भिमा म्हणाली, “तुला इतके हंसू कसे येते ? तुझी पाटी माझ्या सारखीच जड आहे, आणि तू म्हणजे माझ्यापेक्षा अधिक सशक्त आहेस असेही नाहीं. ' | चिमानें उत्तर केले, ६ मी आपल्या ओझ्यावर एक विशेष प्रकारची लहानशी वनस्पति ठेविली आहे; त्यामुळे या माझ्या ओझ्याचे मला कांहींच वाटत नाहीं. भिमा म्हणाली, खरेंच कां ? तर मग ती लहानशी परंतु विशेष मूल्यवान् वनस्पति असली पाहिजे ! तिच्या योगाने मला माझेही ओझे हलके करता येईल. मी तला हात जोडते, ती वनस्पति काय आहे, ती कृपा करून मला सांग, ११ चिमाने पुनः तीस नीट समजावून सांगितलें * ती अमूल्य लहान वनस्पति, जी सर्व अवघड गोष्टी सवघड करते, जी सर्व असह्य दुःखें सह्य करते, जी जड ओझे हलके फूल करते, जी कठोर व कटु बोलणी ऐकून घेण्याची ताकद अंगी आणते, ती वनस्पति सहनशीलता होय. १ आणखी पुढे ती म्हणालीः बाजा सहन करण्याची धिमाई अंगी असणे , तेणें |, होते मोठ्या आनंदाने मार्ग क्रमणे.