पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७४ ) व त्यामुळे गरगर फिरणाच्या या जगरूपीं सहाणेवर मनुष्याच्या अंगचे निरनिराळे गुणधर्म निरनिराळ्या बाजूने सतत घासत राहातात, व शेवटी ते फारच तीक्ष्ण होऊन तेजास चढतात. म्हणून संकटे वगैरे सोसून सहनशील बनलेला मनुष्य हा अष्टपैलूदार हिराच बनतो. व तो जेथे जाईल तेथे आपल्या अंगच्या गुणांनी चमकू लागतो.

  • हे विषयांतर झाले.

हेंडरसन म्हणून इंग्लंडांत एक प्रसिद्ध नट होऊन गेला. तो मोठा सहनशील असे, ऑक्सफर्ड येथे असतांना एका विषयावर एकदां त्याचा आणि त्याच्या एका शाळेतील सोबत्याचा वादविवाद चालला होता. वादामध्ये आपल्यावर बाजू येऊ लागली असे पाहून त्याचा सोबती अतिशय संतापला, आणि समोरच दारूने भरलेला एक ग्लास होता तो घेऊन त्याने हेंडरसनच्या तोंडावर फेकला, हेंडरसनने मुकाट्याने आपल्या खिशांतील हातरुमाल काढला व त्याने तोंड पुसले आणि शांतपणे म्हणाला “ हें विपयांतर झालें,आतां चालू द्या तुमचे काय म्हणणे आहे ते. अमूल्य वनस्पति. दोघी मजूरदारिणी, भिमा आणि चिमा, फळांनी भर