पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७३ ) मनुष्याच्या अंगीं सोशिकपणा सहजच उत्पन्न होतो, कोणत्याही प्रसंगी मनुष्याने निश्चयाने व नेटाने वागावें. प्रसंगी तसे वागण्यासाठी, त्या गोष्टीचा पूर्वी बराच अभ्यास झाला पाहिजे. समरांगणामध्ये मागे पाय न घेतां शत्रूशी निकराने लढण्याचे धैर्य अंगीं यावे म्हणून शूर योद्धा शांततेच्या वेळी सतत अभ्यासाने आपल्या ठिकाणी तशी शक्ति उत्पन्न करीत असतो. परीक्षेच्या वेळी सहा सहा तास एकाग्र मनाने प्रश्न सोडविण्याची तयारी अगोदरच पुष्कळ दिवस करावी लागते. ती ऐत्यावेळी करू म्हटले तर साध्य होणार नाही. त्याच प्रमाणे पहिलवान लोक आपल्या सोबत्यांशी रोजच्या रोज तालमत झटूनच प्रतिस्पर्ध्यास कुस्तीत चीत करण्याचा दमदारपणा व सामर्थ्य वाढवीत असतात. हे सर्वांस माहीत आहेच. त्या प्रमाणेच पूर्व वयांत जितक्या अडचणी अधिक येतील व श्रम जास्त पडतील तितकी आपली सहनशाक्त जास्त वृद्धिंगत होते. अशी सहनशीलता वाढली म्हणजे चित्ताची शांति सहसा नष्ट होत नाहीं. श्रम व अडचणी सोसण्याचा एकदां सराव झाला म्हणजे त्यांची आपणास बिलकूल परवा वाटत नाहीं, उलट त्यामुळे शारराचे निरनिराळे अवयव व मनाच्या पृथक शाक्त यांस संकट मूलक क्लेश सहन करण्याचा अभ्यास घडून त्यांस बळकटी येते. व पुढे पुढे तर संकटे, अडचणी व केश यांचे कांहींच वाटेनासे होते. गरीबी, संकटें व दुःखें यांशी झगडतांना अंगांत उद्योग साहस व डावपेच हीं येतात, व ती पुढे पुढे वाढत जातात.