७२ तकवा, जोम, सोशिकपणा इत्यादि मर्दुमकीचे गुण येण्याकरिता, त्यांचे निजणे, बसणे, आहार इत्यादिकांचे नियमन फार कडक रीतीने केलेले असे. असे शिक्षण रावापासून रंकापर्यंत सर्वांना आपल्या मुलांना अवश्य द्यावे लागे. अशी कडक शिक्षण देण्याची पद्धत जोपर्यंत ग्रीक लोकांत चालू होती, तोपर्यंत ते लोक मोठे वैभव व सुख भोगत होते, | लहानपणापासूनच असे शिक्षण असले म्हणजे मनुष्य प्रसंग पडेल तसा वज्राप्रमाणे कठिण व फुलाप्रमाणे मऊ बनतो; व जें जें करणे त्यास प्राप्त होईल ते सर्व ता कांहीं एक कुरकूर न करितां करीत असतो. ज्या ज्या वेळी त्याच्यावर संकट गुदरून, त्याचे मनास पीडा होते, तेव्हां असा मनुष्य असे मानीत असतो की, आलस संकट हे दुर्दैव नसून ते धैर्याने सहन करणे, या सारख दुसरं सुख नाहीं. असा मनुष्य यशप्राप्ति झाली असती गवानं गत नाही, किंवा अपयश आले असता हताश होत नाही, पण धीराने, आशेनें व नेटान यश प्राप्त होईपर्यंत त्या कामाचा पिच्छा पुरावणे हे आपल, कर्तव्य आहे असे तो समजतो. सोशिकपणणाची संवय लावून घेण्यास प्रवास है एक उत्तम साधन आहे. कारण प्रवासांत नेहमीच आपल्या मनाप्रमाणे व तब्येती प्रमाणे सर्व सोयी होतात असे नाही. कितीही श्रीमंत व अधिकारी !रुप असला तरी त्या प्रवासात अडचणी या उत्पन्न होतातच. अशा अडचणी"
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/80
Appearance