पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१ घर्षणाशिवाय चंदनाचा सुगंध सुटत नाहीं, तावल्याशिवाय सुवर्णाचे उज्ज्वल रूप दिसत नाही, त्याचप्रमाणे परिश्रम केल्याखेरीज व संकटे सहन केल्याखेरीज सदाचरणाचे खरे रूप कळावयाचें नाहीं. संकटें सोसणे हा सद्गुण वाढविण्याचा अभ्यासच होय, आरंभापासून सर्व गोष्टी यथास्थित असून ज्यांनी मोठी कृत्य केली अशी उदाहरणे इतिहासांत फारच थोडी सांपडतील; परंतु पूर्वी संकटे, विपत्ति व दरिद्र यांची पीडा सोसून व अतिशय श्रम करून उदयास आलेल्या पुरुषांची उदा। हरणें हजारों आहेत. व अशांची चरित्रे फार रमणीय असतात, प्रथमच कायसिद्ध झाल्याने मनुष्य तेवढेच काम करून बहुतेक आळशी बनतो; परंतु योग्य परिश्रम करून अजय आल्याने अधिक उद्योग करून मनुष्य विलक्षण महत्त्वास चढतो. ज्याप्रमाणे कित्येक ठिकाणी जमीन भाजली असतांच अंकुर जोरदार येतो, त्याप्रमाणे कित्येक वेळां संकटें व अडचणी ह्याच मनुष्याच्या हातून महकृत्यें करविण्यास कारण होतात. " म्हणून प्रत्येकाने मन व शरीर सुस्थितीत असतां पुढे प्राप्त होणा-या अडचणीस तोंड देण्याची तयारी करीत असावे. सर्व गोष्टी यथास्थित असतील तेव्हा देहाला भी सवय लावून ठेवावी की, पुढे दैववशात विपत्ति प्राप्त झाली असतां, तिचे त्यास कांहींच वाटू नये. प्राचीन काळी ग्रीक लोकांमध्ये मुलांच्या अंगांत लहानपणापासून