पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९ नेणेस आपण समर्थ होतो; व संकटांना टक्कर देतांना आपण बिलकूल डगमगत नाहीं. शरीराच्या सुदृढपणाला जशी शारीरिक परिश्रमाची आवश्यकता असते, तशीच मन तयार होण्यास आपत्ति आणि अडचणी यांची आवश्यकता लागते. | काबाडकष्ट, क्लेश आणि विपत्ति यांसारखा मनुष्याच्या मनाला शिक्षण देणारा उत्कृष्ट शिक्षक, दुसरा कोणताही नाहीं. शरिराचा व मनाचा दुर्बलपणारूपी रोग घालविण्यास यांच्या सारखा उत्तम वैद्य जगांत कोठेही नाहीं. लोहार ज्याप्रमाणे लोखंड तापवून त्यावर घणांचे घावांवर घाव घालून त्याला आपल्या मनाप्रमाणे आकार देतो, त्याप्रमाणे काबडकष्ट, दु:ख आणि संकटें ही मनुष्याच्या शरिरावर व हृदयावर निर्दयपणे जोराने आघात करून त्याला सुदृढ बनवत असतात. त्यांच्या आघातांनी आपण अगदी गांगरून जाऊन हृदयद्रावक अशा आर्त स्वराने त्यांतून सोडविण्याविषयी आपण परमेश्वराची करुणा भाकतों; परंतु या संकटरूपी लोहारांच्या हृदयांत अणुमात्र दया नसते. त्यांचे घाव मारण्याचे काम सारखें चालूच असते. परंतु त्या निर्दय आघातांचा परिणाम मात्र आपणाला न कळत आपल्या पथ्यावर पडत असतो. कारण त्यांच्या आघातांनी शेवटी आपले शरीर व मन हीं तयार होतात, हृदय सुदृढ बनते, मनाच्या प्रवृत्ति स्थिर होतात व आपले निश्चय व प्रतिज्ञा लोखंडाप्रमाणे घट्ट होतात. । - लहानपणापासून ज्यांचे उत्तम लालनपालन झालेले असते, दुस-यांच्या प्रयत्नांनी आणि परिश्रमांनी ज्यांचे विद्याभ्यास होतात, ज्यांचे पूर्ववय ऐषआरामांत गेलेले