पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ (९) सहनशीलता. - - संपत्कालीं कोवळे सज्जनांचें ।।। होते चित्त ज्ञातिपकेरुहाचें ।।। आपत्कालीं शैलही आदळो कां ।। थाके ना जें गाजवी धैर्य-डंका ।।१।। | वामन पंडित. | सहनशीलता म्हणजे सोशिकपणा. एवढीशी गोष्ट मनाविरुद्ध झाली, तर कांहीजण रुसतात; कित्येक अगदी क्षुल्लक कारणाकारितां सुद्धां रागावतात व कित्येकांस तर अशी खोड असते की, थोडेसे काम अगर श्रम जास्त पडले, कीं। लागलीच ते मेटाकुटीस येतात. एवढेसे संकट किंवा भय उप्तन्न झाले, तर काहीजणांची अगदी गाळण उडून जाते। पण अंगीं एक सोशिकपणा असला म्हणजे या सर्व गोष्टींचे कांहीं वाटेनासे होते. म्हणून सहनशीलता हा सद्गुण अंगीं असणे फार चांगले आहे. थोड्याशा प्रयत्नाने हा गुण अंगीं आणतां येतो; म्हणून तो अंगी आणण्याचा प्रयत्न सर्वांनी लहानपणापासून करावा हे फार उत्तम आहे. पूर्ववयांत आपण अंगमेहनत आणि परिश्रम केले, तर * शरीर सुदृढ होऊन आपलें बल वाढते. पूर्ववयांत मेहनतीने शरीर जितकें सुदृढ होते, तितके ते पुढे होत नाही. त्याचप्रमाणे तरुणपणी करावे लागलेले श्रम व काबडकष्ट, सोसाव्या 0 लागलेल्या आपत्त,क्लेश आणि चिंता,यांच्या योगानें शरीर व मन हीं तयार होतात,त्यामुळे आपले निश्चय व प्रतिज्ञा तडीस