पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ धारिष्टवान् लेखक - --- एके दिवशीं लढाईच्या ऐन वेळी तोफांचा मार गिरी चालली असतां, सैन्याला हुकूम लिहिण्याकरितां कोणी लिहि|णारा पाहिजे म्हणून नेपोलियल बोनापार्ट या शूर सेनापतीने हाक मारली; तेव्हां त्याच्या खारीबरोबर जुनो नांवाचा एक इसम इतर सरदारांबरोबर होता, त्याचे अक्षर चागले व तो जलद लिहिणारा म्हणून पुढे आला. व नेपोलियनने | सांगितलेले शब्द त्याने शाईने कागदावर लिहून घेतले; इतहै क्यांत समोरून शत्रूकडून तोफेचा गोळा आला; तो जुनो च्या पयांपाशी पडून त्याचे धडक्यासरशी माती उधळली ती सर्वत्र पसरली व कागदावरही पडली. तेव्हां बिलकूल न कचरतां जुनो शांतपणे म्हणालाः-‘महाराज, हे बरें झाले; आतां यावर वाळू घालण्याची जरूर नाही. ही त्याची हिंमत पाहून या वेळेपासून नेपोलियनने जुनोवर मेहर नजर ठेवली;व पुढे योग्य वेळी या धैर्यवानाला त्याने मोठ्या नांवलौकिकास चढविलें. 5)