पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ नेहमी बर्फमय असतो. लवकरच त्याचे जहाज बर्फत अडकले आणि त्या त्यांतून बाहेर निघतां येईना. भवतालचे पाणी गोठून दगडासारखं कठिण झाले होते. मध्यरात्री सुरेख चांदणे पडले होते. तेव्हां नेल्सन आणि दुसरा एक तरुण कामगार यांना दूर बफवर एक माठे पांढरे अस्वल दिसले. ते दोघे बंदुका घेऊन त्या अस्वलाच्या मागे लागले. दोन तास झाल्यावर ही गोष्ट त्या जहाजावरच्घा कसानास कळली. तेव्हा त्याने, त्यांनी परत यावे म्हणून एका निशाणाने खूण केली. कारण एवव्याशा दोन मुलांनी पांढ-या अस्वलाशी लढण्याचा प्रयत्न करणे फारच धारिष्टपणाचे काम होते. त्या मुलांनी कप्तानाने केलेली खूण पाहिली. आणि ती पाहून नेल्सनचा सोबती माघारी फिरला; पण नेल्सन माघारी फिरेना. त्यानं अस्वलाशी अगदी लगट केली; पण त्याची बंदूक उडाली नाही. तेव्हां बंदुकीचा दांडक्यासारखा उपयोग करून तिने त्या अस्वलाचा चांगला समाचार घ्यावा असे त्याने मनांत आणले; पण इतक्यांत अस्वल आणि नेल्सन यांच्यामध्ये बर्फीला मोठी थोरली एक भेग पडल्यामुळे त्याला अस्वलाजवळ जाताच येईना. तेव्हां तो जहाजाकडे हळूहळू येऊ लागला. तेव्हां ६६ परवानगी घेतल्याशिवाय जहाजावरून कां गेलास  ? म्हणून कप्तानाने त्याला विचारले. नेल्सनने उत्तर दिलें. ६ माझ्या मनांत ते अस्वल मारून त्याचे कातडे बाबांना पाठवून द्यावयाचे होते म्हणून मी गेलों. १