पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५ नेल्सनचा धीटपणा,

      • इंग्लंड देशांत नेल्सन नांवाचा एक मोठा सुप्रसिद्ध आरमारावरील सेनापति होऊन गेला. तो लहान असतांना एके दिवशीं, गांवापासून दूर असलेल्या एका ओढ्याच्या कांठी पाण्याच्या प्रवाहाची मौज पहात सहज बसला होता. रात्र झाली, अंधार पडला, तरी त्याला त्या गोष्टीची | खबरही नव्हती. शेवटी बरीच रात्र झाली तरी मुलगा

अद्याप घरीं कां आला नाहीं ! म्हणून त्याची आई त्याचा शोध करीत करीत त्या व्यापाशी आली आणि त्याला घरी घेऊन गेली. त्याला तिनं जातां जातां सहज विचारले, “बाळा, तू तेथे अंधारांत एकटा बसला होतास, तुला भीति कशी वाटली नाहीं? त्याने तिला उलट विचारले, “आई, भीति कसली असते ग? म ती कधी पाहिली नाहीं. लहानपणीसुद्धा ज्याला भीति हा कसला पदार्थ आहे हैं। ठाऊक नव्हते, असा हा नेल्सन् पुढे शूर सेनापति झाला, यांत मोठेसे आश्चर्य नाहीं. नेल्सन व पांढरें अस्वल. - ०%- नेल्सन सुमारे पंधरा वर्षांचा असता त्याला त्याच्या चुलत्याबरोबर जहाजांतून आर्किटक महासागरांत जाण्याचा प्रसंग पडला. हा महासागर अगदी उत्तरेकडे असून तो