पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ तेच आपण निर्भयपणे चाललों व जरा धारिष्टाची ऐट आणून त्यांच्याकडे टक लावून पाहिलें कीं, लागलीच ती शैंपूट खाली करून पळून जातात; याचा अनुभव सर्वांस थोडा फार आहेच, त्याचप्रमाणे जर आपण धारि ने | वागलों, तर वाघ, सिंह, लांडगा वगैरेवर सुद्धा | सरशी मिळवू. धरसोडीने आणि भीतीने आपण आपणांवर विनाकारण संकट ओढून घेतों. कोणत्याही प्रसंगाने चिताचा स्थिरपणा बिघडू देऊ नये, कोणतेही संकट संकटाच्या भीतीहून अधिक भयप्रद नसते. अविचारीपणा धारिष्टाहून फार भिन्न आहे, हे मात्र लक्षात ठेवावे, संकटाविषयी बेफिकीर असणे अथवा अचरटपणा करून विनाकारण वेळोवेळी आपला जीव धोक्यांत घालणे ह्याचें नांव अविचारीपणा, व संकट प्राप्त झाले असतां धीराने त्याला तोंड देणे ह्याचे नांव धारिष्ट, कोणतेही अवघड काम निर्विघ्नपणे तडीस नेण्याच्या काम धारिष्टाचाच फार उपयोग होतो. पण तेच काम अविचारीपणाने केल्यास त्या कामाचा नाश होतो; एवढेच नव्हे, तर असे करण्यापासून आपला जीवसुद्धां धोक्यांत येण्याचा फार संभव असतो, करितां कोणतेही कठिण कार्य तडीस नेतांना संकट प्राप्त झाले असतां धैर्य धरून ते निभावणे हेच मनुष्यास योग्य व हितकर आहे.