पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ ग्यास संकटांतून सोडविण्यास कसा पुढे येईल? जे मोठे शूर असतात ते तसेच दयाशीलही असतात. | धैर्यवान् कोणाला म्हणावयाचें ? ज्याचे दोन्ही समर्थ बाहू कितीही भयंकर संकटपरंपरा प्राप्त झाली, समचार विपन्नावस्थेचे कितीही विस्तृत जाळे पसरलेले असले, तरी त्यांचा चक्काचूर करून टाकण्यास नेहमी तत्पर असतात त्यासच शत्रु असो किंवा मित्र असो; संकटाच्या वेळी त्याचे रक्षण करण्याकरितां जो नेहमी पुढे सरसावतो, ज्याला स्वतःच्या सौख्यापेक्षा दुस-याच्या सौख्याची जास्त कळकळ वाटते तोच खरा शूर होय. असे शूर व थोर पुरुष कसाही प्रसंग असला तरी सावधपणा राखून चित्त शांत ठेवतात व संकटांतून दुस-याची व आपली सुटका करितात. खरा शूर असतो तो मोठा उदार असतो. अंग धारिष्ट नसेल तर मनुष्य दुष्ट, खोटा, क्रूर, कुत्सित, निरुद्योगी व व्यसनी होतो. धैर्याशिवाय नीति व सदाचार हीं क्वचितच राहातात. धैर्यवान् पुरुष मोठे क्षमाशील असतातसंकटसमयी कित्येकांची अशी धांदल होऊन जाते की, त्यांना त्या संकटांतून निभावण्याचा कांहींच उपाय सुचत नाही. यामुळे ते खबुतराप्रमाणे उगीच जिवास मुकतात, जेव्हा एखादें मांजर येते, तेव्हां खबुतरे आपले डोळे मिटतात. त्यांना वाटते की, आपण डोळे मिटले म्हणजे आपणांस मांजर दिसत नाही म्हणून मांजरास सुद्धा आपण दिसत नसू ! मांजर पण त्यांना खाऊन टाकतेच. तसे भ्यालात तर मांजर तुम्हांलासुद्धा त्रास देईल. खेड्यांतून हिंडतांना आपण यत्किंचित् जरी भ्यालों तरी कुत्री आपल्या अंगावर धावून येतात;