पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ मर्दपणा अंगी असणे हा पुरुषवर्गाचा मुख्य पौरुष गुण आहे. यावरून स्त्रीजातींत हा गुण असू नये असे मात्र । होत नाही. जर दुर्दैवाने त्यांच्या अंगी हा नसेल, तर ती गोष्ट क्षणभर क्षम्य होईल, इतकेच काय ते. हा गुण ज्याचे अंगी नसेल त्याचे बद्दल इतरांना फार तर दया वाटेल व कींव येईल; पण आदर वाटणार नाहीं. करितां धारिष्ट हा गुण अंगी आणण्याविषयी लहानपणापासूनच प्रयत्न करीत असावे. कारण राष्ट्रांत काय किंवा व्यक्तींत काय, इतर । सात्विक व राजस सद्गुण कितीही वसत असले, तरी त्याचे अंगी शैौर्य, धैर्य, धिमपणा, करारीपणा वगैरे क्षात्रधर्म कोणत्या तरी रूपाने वसत नसतील, तर त्याला जगांत कोठेही मान मिळणार नाही. | धैर्य व उत्साह हे गुण अंगी असले तर मनुष्य आपल्या शहाणपणाने जगांत केवढाले अद्भुत चमत्कार करील याचा नेम नाहीं. पाहा! कालवाने नवीन महाद्वीपाचा शोध लावण्यास आरंभ केला, तेव्हां नानाप्रकारची संकटे त्याच्यावर आली, अज्ञानी लोकांनी हसून त्याची टर उडविली; त्याच्या बरोबरच्या खलाशांनी निराश होऊन त्यास समु| दांत टाकण्याचा प्रयत्न केला; तथापि त्याने धैर्य सोडले नाहीं, आपला बेत त्याने तडीस नेला. यामुळे प्राणिमात्राचे सौख्यांत किती तरी भर पडली आहे. हे आपण आज पहातच आहों. धैर्य व या हे गुण वेगळे नाहीत; इतकेच नव्हे, तर त्यांचा एकमेकांशी अगदी निकट संबंध आहे. कारण धैर्याशिवाय दयेचा व्हावा तसा उपयोग होत नाही. भित्रा मनुष्य दुस