पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८) धारिष्ट, - - मन B धावं धरावें ।।। भना बालणे नित्य सोशात जावें ।। रामदास. कोणतेही संकट आले असता त्याला धैर्याने तोंड देणे ह्याला धारिष्ट म्हणतात. धारिष्ट हा फार महत्त्वाचा सण आहे. म्हणून तो सर्वांच्या अंगी असणे अत्यंत जरूर आहे. प्रवासांत तर धारिष्टासारखा दुसरा मित्र नाही. ज्याच्या अंगी हा गुण नाही, त्याला पुरुष हे नांव शोभत नाहीं. आपण होऊन कोणी सहसा आपले अंगावर संकट ओढून घेत नाही, पण अपरिहार्य कारणामुळे व अकस्मात् संकटप्रेसंग प्राप्त झाला, तर त्या व भित्रेपणा अगदी दाखवू नये. कारण, त्यामुळे तो प्रसंग अधिकच भीतिदायक व भयंकर होतो. अशा प्रसंगी धैर्य धरणे हाच स्वसंरक्षणाचा उत्तम मार्ग होय. हितोपदेशांत यासंबंधाने असे म्हटले आहे कीं; तावद्भयस्य भेतव्यं यावद्भयमनागतम् ।। आगतं च भयं वीक्ष्य प्रहर्तव्यमभीतवत् ।। | म्हणजे जोपर्यंत संकट आले नाही, तोपर्यतच त्याची भीति बाळगावी; पण ते एकदां आलें न्हणजे धैर्य धरून त्याशी टक्कर द्यावी. शारीरिक, नैतिक व मानसिक गोष्टींत मादव हा जसा स्त्रीजातीचा मुख्य सद्भुण आहे, तसा या तिन्ही बाबतीत ६