पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५९ तेथे काजीने त्याची कसून झडती घेतली. पण त्याच्या जवळ कांहीही सांपडले नाहीं; अगर त्याला चारीबद्दल अथवा फसवणुकीबद्दल शिक्षा करण्यासारखा कांहीं पुरावाही मिळेना. तेव्हा हा चेटकी माणूस आहे असे म्हणून त्यावर काम चालविण्याच्या बेतांत ते होते इतक्यांत तो दरवेशी मोठ्या शांतपणाने त्या न्यायाधिशास म्हणाला- तुमची अशी तारंबळ उडालेली पाहून मला मोठी मजा वाटते. व तुम्हांला माझ्याबद्दल असा संशय आला तोही अगदी निराधार नाहीं हे मी कबूल करत. मी पुष्कळ दिवस असाच एकटा रहात आहे; पण ओसाड मैदानांत सुद्धा अगदी बारकाईने पाहण्यासारख्या पुष्कळ गोष्टी मा आढळतात. मी मैदानांतून चालत असतां उंटाची पावले मला दिसली; पण उंटाच्या पाठोपाठ अगर आसपास मनुप्यांची पावले उठलेली कोठेही मला आढळली नाहींत. यावरून मी असे ताडलें कीं, हा उंट आपल्या धन्यापासून सुटून गेला आहे. रस्त्याच्या फक्त डाव्या बाजूचा झाडपाला त्याने खाल्लेला मला दिसला यावरून मला असे वाटलें कीं, तो उंट उजव्या डोळ्याने आंधळा असावा. तो मागच्या डाव्या पायाने लंगडा असावा असे म्हण ण्याचे कारण हे की, त्या पायाच्या खुणा वाळवंटावर अगदी पुसट उठल्या होत्या. त्याने जेथे जेथे गवत खाल्ले होते. तेथे तेथे मध्येच थाडेसे गवत अगदी जसेच्या तसेच त्याच्या चाव्याच्या तडाक्यांतून वाचले होते. यावरून मी असे म्हणतों की, त्या प्राण्याचा एक दांत पडला होता, त्याच्या