पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हरवलेला उंट, ७) एक दरवेशी एका ओसाड मैदानांत एकटाच फिरत असतां त्यास दोन व्यापारी अकस्मात् भेटले. तेव्हां तो त्यांस म्हणाला- “तुमचा एक उट हरवला आहे काय ? ' ते ह्मणाले–“होय- दरवेशी म्हणतो “ ते उजव्या डोव्याने आंधळा व डाव्या पायाने लंगडा होता काय ? " “होय, तो तसा होता. " असे व्यापा-यांनी उत्तर दिले. दरवेशी आणखी विचारतो–“त्याचा पुढचा एक दांत पडला हाता ना? ते ह्मणाले–“होय–'दरवेशी आणखीं ह्मणाला-- * त्याच्या पाठीवर, एका बाजूला मधाचे बुधले व दुस-या बाजूला धान्याचे गोण लादले होते काय? ते म्हणाले “होय खरोखर तो तसाच लादलेला होता. आणि ज्याअर्थी तू त्यास नुकताच इतक्या बारकाईने पाहिला आहेस–स्या- अर्थी तो कोठे आहे हे आम्हांस लवकर दाखीव. यावर दरवेशी म्हणाली,--“माझ्या मित्रांनो,तुमचा उँट कसला आहे. तो मी डोळ्यांनी आजवर केव्हांच पाहिला नाहीं; व तो होता अशाबद्दल या पूर्वी कधी ऐकलेही पण नाहीं. तेव्हां ते व्यापारी म्हणाले-तो तू आम्हांस दाखव अगर नको दाखवू कारण ती अगदी क्षुल्लक बाब आहे; पण त्याच्या पाठीवराल गोणीत रत्नें होतीं ती कोठे आहेत? 4 मीं तुमचा उंटही पाहिला नाहीं व रत्नेही पाहिली नाहींत 'असे जेव्हां दरवेशी पुनः पुनः सांगू लागला, तेव्हां त्यांनी त्यांस पकडलें व काजीकडे घेऊन गेले,