पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

༢༦ टेम्स नदीचा बागदा. - - मुंगे लाकडांस वाटोळी भोके पाडतात असे आपण नेहमी पाहातो; परंतु या गोष्टीचे आपणांस कांहीं आश्चर्य वाटत नाहीं अगर या प्राण्यांचे कृतीपासून कांहीं नवीन । शिकण्यासारखे आहे किंवा कसे याबद्दल विचार करण्याचे आपले मनांत सुद्धा येत नाहीं. शिपवर्म म्हणून एक किडा आहे. तो गलबतांचे फळ्यांस भोंकें पाडतो. असा एक किडा भोक पाडीत असतां सर इसाम्बार्ड ब्रुनेल या नांवच्या एका गृहस्थाने पाहिला. त्याने त्याच्या या कृतीचे सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण केले. व पुढे मोठ्या प्रमाणावर त्याच कृतीचे अनुकरण करून प्रसिद्ध टेम्स-बोगदा बांधिला, अशा रीतीने अल्प वस्तूचे योग्य निरीक्षण केले तरच नेत्रांचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल, कोणतीही वस्तु पहिल्याने अगदीं क्षुल्लक दिसते. परंतु जसजसे त्या वस्तूचे निरीक्षण करीत जावें तसतशी त्या वस्तूची खरी किंमत आपणांस कळून येते व अनेक महत्त्वाचे शोध लावतां येतात. यासाठी प्रत्येकाने निसर्गाने निर्माण केलेल्या वस्तु लक्ष्यपूर्वक पहाव्यात व आपआपल्या बुद्धिसामर्थ्याप्रमाणे त्यांचेपासून प्राणिमात्रांच्या सुखांत जास्त भर घालण्याचा प्रयत्न करावा.