पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ परिणाम होतो तो पहावा. तोटी व झांकण बंद केल्यावर ती किटली फुटून गेली. यावरून वाफेची शक्ति फारच । मोठी आहे असे त्याचे लक्षांत अले. व वाफेने चालणारे इंजिन त्याने तयार केले. परंतु हा शोध प्रथमच लागल्यामुळे त्यांत बरेच वैपुण्य राहून गेले. | पुढे इ० स० १७३६ मध्ये स्कॉटलंड देशांत जेम्स वॅट नांवाचा एक इसम जन्मला. तो लहान असतां त्याने वर सांगितल्याप्रमाणे किटलीचे तोंडांतून वाफ येत असतां पाहिली. नंतर वाफेचे शक्तीबद्दल त्याने फारच परिश्रम । करून प्रयोग करून पाहिले. व वाफेच्या इंजिनमध्ये त्याने महत्त्वाच्या सुधारणा केल्या. हल्ली आगगाड्या, आगबोटी व मोटारी वगैरे प्रवासाची जीं सुलभ साधने आपणांस लाभली आहेत, ती वर लिहिलेल्या शोधांची फळे आहेत, हे लक्षात ठेविले पाहिजे, लॉबता पूल. कॅपटन् ब्राऊन या नांवाचा एक थोर पुरुष युरोपखंडांत होऊन गेला. तो एके दिवशी सकाळी आपले बार्गेतून फिरत असतां एक कोळ्यांचे जाळे हवेत लोंबत असलेले त्याने पाहिलें. बराच वेळ विचार केल्यावर त्यास असे वाटलें कीं, लोखंडी तारेचा त्या जाळ्याच्या नमुन्याप्रमाण एक लोंबता पूल बांधता येईल. शेवटी त्याने पुष्कळ परिश्रम करून एक लोंबता पूल तयार केला व या त्याच्या कृतीस चांगले यश आलें.