पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५५ थोडे वाचले असतील. डॉक्टर सर रवींद्रनाथ टागेर हे विश्वविद्यालयाच्या पदव्यांनी फारच थोडे विभूषित झाले असतील. तेव्हां साहजिक असा प्रश्न उद्भवतो की,यावचंद्रदिवाकरौ जगन्मान्य होण्याइतके असामान्य शहाणपण या लोकांनी कोठून पैदा केले? तर त्यांनी ते वाचनाबरोबरच भोंवतालच्या परिस्थितीचे व सृष्टीचे सूक्ष्मावलोकन करूनच मिळावले. सृष्टि ही सर्व ज्ञानाचा साठा आहे. ती ईश्वर निर्मित मोठा ग्रंथच आहे. या ग्रंथाच्या अवलोकनापासून मोठे सुख व ज्ञान प्राप्त होते. या सृष्टिरूपी ग्रंथाचे आकाश, चंद्र, सूर्य, तारे, पर्वत, नद्या, समुद्र, सरोवरें, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, झाडे, वेली, फुले वगैरे असंख्य भाग आहेत. त्या प्रत्येक भागाच्या अवलोकनापासूनच विद्वानांनी प्राणिमात्रांच्या सुखांत आजवर भर घातली आहे. ज्या थोर पुरुषांनी आपल्या नेत्रांचा खरा उपयोग करून अद्भुत शोध लावले व प्राणिमात्रांच्या सुखांत भर घातली अशी कांहीं उदाहरणे थोडक्यांत पुढे देतो. वाफेच्या शक्तीचा शोध. लंडन टॉवरमध्ये सुमारे दोनशे वर्षांपूर्वी मार्किस ऑफ वुरसेस्टर या नावाचा एक इसम कैदी होता. यान किटलीच्या तोंडांतून वाफ (आंतील पाण्यास आधण आल्यामुळे) बाहेर येत असलेली पाहिली. तेव्हा त्याचे मनांत असे आले कीं, ह्या किटलीची तोटी व झांकण बंद करावे व काय