पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ नुसते बाह्य स्वरूप न पाहातां त्या वस्तूचे गुणधर्म समजावून घेण्याचा प्रयत्न करावा. ती कशी बनलेली आहे, ती अशीच कां आहे, ह्यापेक्षा भिन्न स्थितीत असती तर काय झाले असते, इचे कायमचे व सतत टिकणारे हेच स्वरूप आहे काय? वगैरे सर्व गोष्टींचा बारकाईने शोध करावा व अशा शोधापासून प्राणिमात्रांचे सुखांत भर कशी घालतां येईल हे मुख्यत्वेकरून पहावे. असे केले तरच आपण आपले नेत्रांचा ती वस्तु पाहाण्याकडे खरा उपयोग केला असे म्हणता येईल. शहाणपण जसे चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने यतें, तसेच तें सभोंवार चाललेल्या परिस्थितीच्या अवलोकनानें| ही प्राप्त होते. कित्येक असामान्यबुद्धाच लोक जगाचा व्यवहार काळजीपूर्वक अवलोकन करूनच अलौकिक कार्ये करण्यास समर्थ होतात. प्लटो व अरिस्टॉटल या नांवाचे दोन फार प्रख्यात तत्त्ववेत्ते यूरोपखंडांत होऊन गेले. त्यांच्या वेळीं विश्वविद्यालये नव्हती; तरी त्यांचे तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ आजही जगास चाकत करून सोडीत आहेत. न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा नियम लोकांनी लिहिलेली पुस्तके वाचून सांपडला नाही. समाजाचे, व्यक्तीचे व भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करूनच शेक्सपिअरनं जगास वेड लावून सोडणारी नाटके लिहिली आहेत. आबालवृद्ध, सुशिक्षित व अशिक्षित यांना सारखाच भाक्तरस व ज्ञानामृत पाजणारा सुप्रसिद्ध गाथाग्रंथ लिहिण्यास तुकाराम महाराज फारच थोडे वेदांतशास्त्र व काव्यशास्त्र पढले असतील. शिवाजी | महाराजांनीं युद्धशास्त्र व राजकारणशास्त्र यांवरील ग्रंथ फारच