पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१ सूक्ष्मावलोकन. बुद्धि संस्कृत व्हावयास व तिचा विकास व्हावयास वाचन व प्रवास हीं जितकी अवश्य आहेत, तितकेच किंबहुना जरा जास्त सूक्ष्मावलोकन हे अवश्य आहे. वाचन, प्रवास व सूक्ष्मावलोकन हे तीन आत्मशिक्षणाचे मार्ग आहेत. यांचा परस्पर फार निकट संबंध आहे, म्हणून सूक्ष्मावलोकनासंबंधाने थोडेसे येथे सांगतो. | स्वतःविषयी, दुस-याविषयी किंवा जगांतील कोणत्याही वस्तूविषयीं जें मनःपूर्वक, बारकाईने व शोधक बुद्धीने लक्ष देऊन पाहाणे ते सूक्ष्मावलोकन होय. असे अवलोकन करण्याची सवय लहानपणीं सर्वास सारखी असते असे दिसते. कारण मुले हीं लहानपणी फार जिज्ञासु अस - तात. कोणतीही गोष्ट पाहिली किंवा ऐकली म्हणजे ती तिजविषयीं साहजिक अनेक प्रश्न विचारतात. अशा वेळीं त्यांना दरडावून किंवा रागेंभरून त्यांचा हिरमोड करू नये. त्यांच्या या जिज्ञासेला जेथल्या तेथे दडपून टाकू नये' तर अशा वेळी त्यांच्या या शोधक बुद्धीस योग्य वळण देऊन त्यांना अवलोकनाची सवय लावावी. त्यांना अर्श संवय लावणे म्हणजे सृष्टीतील ज्ञानसागरांत त्यांना पोह. ण्याचा पहिला धडा घालून देणेच होय. कारण ज्ञाना प्राप्तीमध्ये निरीक्षण म्ह०अवलोकन ही पहिली क्रिया आहे. ज्या वस्तूचे ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे ती प्रथम इंद्रियगोचर झाली पाहिजे. मुले आपल्याकडून वस्तुनिरीक्षण करण्याकरितां यत्न करीत असतात,