पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| लहान मुलांचे एखाद्या वस्तूकडे लक्ष्य वेधलें म्हणजे तिचे अधिकाधिक ज्ञान करून घेण्याची त्यांस इच्छा होते. अशा इच्छेची प्रेरणा झाली म्हणजे मूल ती वस्तु तोंडांत घालून तिची चव घेऊन बघते; तिला स्पर्श करून ती मऊ आहे किंवा टणक आहे, खडबडीत आहे किंवा गुळगुळीत आहे, कठीण आहे किंवा ठिसूळ आहे, असा नानाप्रकारचा अनुभव घेते; इकडे तिकडे ती फेकून बघते. अशा त-हेनें शक्य तितकें त्या वस्तूचे ज्ञान स्वतःच प्राप्त करून घेण्याचा यत्न करते. अगदी लहान मुलांची ही गोष्ट झाली. पुढे तें जरा जाणते झाले, त्यास चांगलं बोलतां येऊ लागले म्हणजे त्याची ही जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा इतक्यानेच तृप्त होत नाही. मग ते वडील माणसास त्या वस्तूचें नांव व तिचा उपयोग याबद्दल प्रश्नावर प्रश्न विचारीत सुटतें: व अशा प्रकारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकून ते ज्ञान अंतःकरणांत सांठवून ठेवण्याचा यत्न करते. अशा त-हेनें बालकांस ज्ञान प्राप्त करून घेण्याची ही उपजतबुद्धि परमेश्वराने त्याच ठिकाणी ठेवलेली असते. पण आईबाप, पालक व शिक्षक यांना ही ईश्वरी योजना माहीत नसली की, अगोदर मुलांस ते प्रश्नच विचारू देत नाहींत. व मोठ्या मेहरबानीनें कांहीं प्रश्नांचे उत्तर दिलेंच व तोच तो प्रश्न मुलांनी पुनः विचारला तर ते त्रासतात; व मुलेही पुढे भीतीने असे प्रश्न विचारीतनाश होतात. म्हणून त्यांच्या निरीक्षणशक्तीची वाढ खुटू लागते. मुले घरांतले घरांतच, अगर फार झाले तर घराचे आसपास हिंडली तर त्यांचे नजरेसमोर तेच ते