५० शत्रुनाशाचा उत्तम उपाय. । कोणे एके वेळीं चीन देशामध्ये एक मोठे बंड झाले आणि तेणेकरून बादशाहास फार त्रास होऊ लागला. तेव्हां त्याने आपले सगळे सरदार दरबारामध्ये बोलावून आणून बंडवाल्यांवर स्वारी करण्याचा निश्चय केला आणि मोठ्या आवेशाने असे म्हटले की, * बंडखोर आमचे शत्रु आहेत, त्यांचा समूळ नाश केल्यावांचून परत यावयाचे नाहीं. ? नंतर बादशहाचा क्रोध पाहून ते बंडवाले भ्याले आणि त्यास शरण आले. त्यांस बाहशहाने त्यांच्या अपराधाची क्षमा केली; येवढेच केवळ नव्हे, तर ते शुद्धावर आले म्हणून त्यांस एक चांगली मेजवानी देण्याचा विचार ठरविला. ते पाहून त्याचा मुख्य प्रधान त्यांस म्हणाला-“महाराज, आपण दरबारामध्ये त्या दिवशी बोललां काय, आणि आज हैं करतां काय ? शत्रूचा समूळ नाश करावयाचा ना ? ' । त्यावर थोडे हंगून बादशहाने उत्तर दिलें- होय, शत्रंचा समूळ नाश करावयाचा असे मी म्हटले होते,ते मी शब्दशः खरें केले आहे. पहा, आतां हे लोक माझे शत्रु नाहीत; हे माझे मित्र झाले आहेत; त्यांचा मीं नाश केला तर बोललों एक आणि केलें एक असे होऊन मित्रघाताचे पातक माझ्या माथी येणार नाही काय ? " हे भाषण ऐकून तो मुख्य प्रधान निरुत्तर झाला,
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/58
Appearance