पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ ड्यूकसा० म्हणाले- * नाहीं सरकार ! पलटणीचा नियम मोडून तो तीन वेळ पळून गेलेला आहे." | तरी महाराणी साहेबांचा हात सही करण्यास धजेना. त्या मोठ्या अडचणींत पडल्या. त्यांना ‘इकडे आड व तिकडे विहीर " असे झालें. एका बाजूला दया व क्षमा, व दुस-या बाजूला देशाचा कायदा. या दोन बिकट दरींच्यामध्ये त्या अडकल्या. या चिमट्यांतून बाहेर कसे पडावे याचा त्या मनांतल्या मनांत विचार करू लागल्या व पुन्हां त्या ड्यूक साहेबास म्हणाल्या-‘याच्या अंगीं एकही गुण तुम्हांला सांपडत नाहीं असे कसे होईल ? याच्या अंगीं एखादा तरी गुण असलाच पाहिजे. ज्याच्या अंगीं एकही सदुण नाहीं, तो मनुष्य कसला! पाहा नीट विचार करून, एखादा गुण असल्यास सांगा. " यावर ड्यूक म्हणाले-- | ** महाराज, तो मनुष्य फार चांगल्या चालीचा असून शूर आहे अशाबद्दल मला दोन तीन साक्षीदारांनी सांगितले आहे. | तर मग शौर्य व चांगली वर्तणूक हे दोन गुण क्षमा करण्यासारखेच आहेत. आपण हे दोन गुण माझ्या नजरेस आणले याबद्दल मी आपली फार आभारी आहे. | असें ह्मणून मोठ्या आनंदाने पुढे ठेविलेल्या हुकुमाच्या कागदावर * क्षमा केली आहे,' असे मोठ्या ठळक अक्षरांनी लिहून राणीसाहेबांनी त्याखाली आपली सही केली.