Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ या क्षमाशील धर्मराजाचे असे किंवा यांहून जास्त उदात्त व गंभीर प्रसंग भारतांत जागोजाग आढळून येतात. त्या सर्वांचे येथे वर्णन करणे शक्य नाहीं , असो. सारांश, क्षमा हा सण फार चांगला आहे. व त्याचे फलही मोठे आहे. क्षमेच्या योगानें सदाचरण घडते, व सदाचरणाच्या योगानें स्वर्ग प्राप्ति होते. म्हणून क्षमा हा गुण प्रत्येकाने संपादन करावा. ( क्षमाशील महाराणी. - - महाराणी व्हिक्टोरीआ ह्या गादीवर बसल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांचे मुख्य प्रधान डयूक ऑफ वेलिंगटन् यांनी एका मनुष्यास फांशी देण्याच्या हुकुमावर सही करण्याकरितां एक कागद त्यांच्या पुढे ठेविला. महाराणी साहेबांचा असल्या हुकुमावर सही करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. ती शिक्षा एका पलटणीतील शिपायास द्यावयाची होती. कारण तो तीन वेळ पलटणीतून पळून गेला होता. तो हुकूम महाराणी साहेबांनी चार वेळ वाचून पाहिला, तेव्हां त्यास अतिशय वाईट वाटून त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांनी हातांत टाक धरला. व तो दौतींत बुडवून सही करण्याच्या विचारांत होत्या. पण सही करण्यास त्यांचा हात धजेना. कागदापर्यंत हात जाई, पुन्हा मागें येई असे दोन चार वेळ झाल्यावर त्या ड्यूक साहेबाकडे पाहून म्हणाल्या काय हो, तुम्हांला या अपराध्याच्या वतीने कांहींच का बोलता येत नाहीं?