पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ तैमुरलंग शरण आलेल्या लोकांचे रक्षण करीत असे. ही कांहीं सामान्य गोष्ट नव्हे. | अहिल्याबाई होळकरीण ही महासाध्वी पातिव्रता होती. ती सहसा कोणास देहांत शासन करीत नसे. ती म्हणे * ज्या प्राण्यास परमेश्वराने उप्तन्न केले आहे त्यास आपण कसे मारावे. व ती वारंवार म्हणे की, ** जीव घेण्यापेक्षां क्षमा करणेच मला अधिक आवडते. ' खरे आहे. जोपर्यंत मनुष्याला प्राणी उप्तन्न करण्याचे सामर्थ्य नाहीं, तोपर्यंत कोणताच प्राणी मारूं नये हे इष्ट आहे. | एखाद्याने आपला अपराध केला तर त्यास आपण क्षमा करावी. अशा वेळी जर आपले मन त्यास क्षमा करण्यास तयार नसेल, तर आपण असा विचार करावा की, दुसयांनी जर आपल्याशी असेच खुनशीपणाचे वर्तन केले तर त्यापासून आपले हित होईल काय? थोर पुरुष आहेत ते केव्हाही क्षमा सोडीत नाहींत. क्षमा ही अशक्तांचे बल व सशक्तांचे भूषण आहे. क्षमेच्या योगाने पाहिजे त्यास वश करून घेता येते, क्षमावान् पुरुषास या जगांत असाध्य असे कांहीं नाहीं. सर्व पांडवांमध्यें धर्म राजाची योग्यता मोठी कां? तर तो केवळ मूर्तिमंत क्षमेचा अवतारच होता. एकेवेळी भीम गदा घेऊन भर सभेत कौरवांचा नाश करण्यास उद्युक्त झाला. त्या वेळी त्या धीरोदात्त क्षमाशील पुरुषाच्या मुखांतून पुढील उद्गार बाहेर पडले. जरी क्रोध नावरे तुझिया चित्ता ।। तरी गदा ओपीं गा माझिया माथा ॥ मुक्तेश्वर.