Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ देणगी आहे. क्षमा ही राजदंड धारण करणा-यास जशी शोभते तशी ती सामान्य मनुष्यासही शोभते. जे बलवान् आहेत त्यांस तर क्षमा अधिकच भूषणावह होते: ईश्वरानें मनुष्यास ज्याप्रमाणे बुद्धि ही देणगी दिली आहे, त्याप्रमाणें क्षमा ही देणगी त्याने फक्त मनुष्यासच दिली आहे. पशुपक्ष्यांत क्षमा करण्याचा धर्म आढळून येत नाहीं. म्हणून मनुष्यानें क्षमा धारण करावी हे त्यास उचीत आहे. त्याने जर क्षमा धारण केली तर त्यांत मोठेसे आश्चर्य नाहीं. परंतु तोच जर क्षमा धारण न करील तरच आश्चर्य आहे. कारण क्षमा धारण करणे हे मनुष्यत्व आहे, व ती न धारण करणे हा पशुपणा आहे. क्षमा धारण करण्यास कांहीं खर्च लागत नाही. किंवा मोठी विद्या संपादन करावी लागत नाहीं. थोड्याशा विचाराने ती सहज प्राप्त होण्यासारखी असते. । महान् साधु तुकाराम महाराज यांचा क्षमाशीलपणा तर सर्वश्रुतच आहे. त्याचप्रमाणे रामदास स्वामी व साक्रेटीस यांचा क्षमाशीलपणा जागोजाग कसोटीस लागलाच आहे. ज्याप्रमाणे साधुलोक क्षमाशील असतात त्याचप्रमाणे कित्येक राजदंड धारण करणारे राजेही क्षमाशील असतात हैं अधिक होय, तैमुरलंग फार क्रूर व कडक होता. तरी त्याने एके ठिकाणी आपणाविषयी असे लिहून ठेविलें आहे की ५ जेव्हा माझे शत्रु दांतीं तृण धरून मला शरण आले, तेव्हा मी त्यांस त्यांच्या अपराधाची क्षमाच केली आहे. ! पाहा केवढे आश्चर्य आहे! जो रणांगणांत उभा राहिला म्हणजे हजारों लोकांचे प्राण एका क्षणांत घेत असे, तोच