पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५ आहे, व क्षमा न करणे हा राक्षसी दुर्गण आहे. म्हणून मनुष्याने आपल्या अंगीं क्षमा हा गुण आणण्याचा फार प्रयत्न केला पाहिजे. | ज्या मनुष्याच्या हातून चूक होत नसेल त्याने पाहिजे तर दुसन्यास क्षमा न केली तर चालेल. परंतु या जगाच्या पाठीवर ज्याच्या हातून चूक होत नाहीं असा एकही मनुष्य सांपडावयाचा नाहीं. जोपर्यंत मनुष्याच्या हातून चूक होणे संभवनीय आहे, तोपर्यंत दुसन्यास त्याच्या चुकीबद्दल क्षमा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यकर्म होय. मनुष्याच्या अंगीं क्षमा नसेल तर जगांत फारच अनर्थ ओढवतील. दुस-याने अपराध केला असता त्याबद्दल त्याला क्षमा करून त्याजवर उलटी दया करणे हे अत्यंत थोरपणाचे चिन्ह होय. क्षमेच्या योगाने मनुष्य देवपणा पावतो. क्षमेच्या योगाने मोठमोठे अनर्थ टळतात. क्षमा व दया यांच्या योगाने शत्रूचे मित्र होतात. पण क्षमा न करता सूड उगविण्याची इच्छा मनुष्याने धरल्यास अनर्थाची परंपरा ओढ. वते. क्षमाशील मनुष्यास सर्व लोक वंदनीय मानतात. क्षमा हे साधुत्वाचे मुख्य लक्षण आहे. ज्याच्या अंगीं क्षमा व दया हे गुण नाहींत तो साधुच नव्हे. ज्या मानाने मनुष्याच्या अंगीं क्षमा अधिक त्या मानानें तो अधिक श्रेष्ठ, मानव जातीपेक्षां अनंतपट अधिक क्षमा देवाच्या अंगी आहे म्हणूनच तो सर्वांहून श्रेष्ठ आहे. देवाच्या खालोखाल राजा हाच श्रेष्ठ मानिला आहे. परंतु हे राजाचे श्रेष्ठत्व त्याच्या वैभवांत नसून क्षमतच आहे. क्षमाशील अंतःकरण असणे ही सर्वांत मोठी ईश्वरी