Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ [६] क्षमा. .. - --- क्षमाशस्त्र जया नराचिये हातीं ।.. दुष्ट तयाप्रति काय करी ॥ १ ॥ तृण नाहीं तेथे पडला दावाग्नि । जाय तो क्झिन आपसया ॥ २ ॥ तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वाहत ।। धरा अखाडत सुखरूप ॥ ३॥ तुकाराम, कोणताही सद्गुण हा प्रशंसनीयच आहे. त्यांतल्या त्यांत क्षमा हा सद्गुण सर्वात मोठा आहे. त्याची बरोबरी दुसरे फारच थोडे सद्गुण करू शकतात. मनुष्याच्या हातून घडोघडीं अनंत पातकें घडत असतात. त्या सर्वांबद्दल जर परमेश्वराने मनुष्याला शिक्षा करण्याचे मनांत आणले तर मनुष्य एक पळही वाचू शकता ना. परंतु आपल्या हातून पातक घडले व जर आपणाला त्याबद्दल पश्चात्ताप वाटून आपण परमेश्वराला शरण गेलों तर तात्काल तो आपणास त्या पातकाबद्दल क्षमा करितो. परमेश्वराच्या अंगीं क्षमा हा गुण वास करीत आहे म्हणून शाविक लोक देवाला आई असे म्हणतात, व कृतकर्माबद्दल त्याला अनन्यभावें शरण जातात. व परमेश्वरही अशा भावीक लोकांना त्यांच्या अपराधांची तात्काल क्षमा करितो. यावरून असे सिद्ध होते की क्षमा करणे हा दैवी सद्गुण