पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जगूने सर्व जंगल धुंडाळले; परंतु त्यास कोणीच सांपडलें नाहीं. यावर जगू फार रागावून पळत आपल्या आईकडे गेला. आणि गाहाणे सांगू लागला की, ** या जंगलांतील झाडींत एक दुष्ट मुलगा लपला आहे, त्याने मला शिव्या दिल्या. आईने सांगितलें 44 या वेळी तूच आपणा स्वत:स दोषी ठरविलेस. तू आपल्या स्वत:च्या शब्दांच्या प्रतिध्वनी शिवाय दुसरे कांहींच ऐकिलें नाहींस. जर करतां तू त्या झाडींत ममत्त्वाचे भाषण करतास, तर त्याच्याबद्दल तुला ममत्वाचेच शब्द परत मिळाले असते. तात्पर्य. या एकंदर आयुष्यात आपणास असेच प्रसंग येतात. दुस-यांचे जे काय वर्तन आपणाशी घडते, ते बहुतेक आपले वर्तन त्यांच्याशी घडते त्याचा प्रतिध्वनीच असते. आपण दुस-यांशीं मित्रत्वाने वागलों तर दुसरही आपणाशी मित्रत्वानेच वागतील. आपण जर त्यांच्याशी दांडगेपणानें कपटानें, आणि शत्रुत्वाने वागलों तर, त्याचा मोबदला त्याहून जास्त चांगला मिळण्याची आपणांस आश करणें नको.