पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ सारांश-जीभ श्रेष्ठ किंवा दुष्ट करणे हे प्रत्येकाच्या स्वाधीन आहे. तिचा सदुपयोग केल्यास ती श्रेष्ठ ठरून आपणास व दुसन्यास सौख्य होईल व तिचा दुरुपयोग केल्यास ती दुष्ट ठरून तिच्यापासून आपणास व इतरांस त्रास होईल, प्रतिध्वनि. »« जसा तुझा आवाज जंगलांत जातो, तसाच तो वाईट किंवा चांगला परत येता. जगू म्हणून एक लहान मुलगा होता. त्याला प्रतिध्वनीविषय कांहींच माहीत नव्हते. तो एके दिवशी जंगलांत ** हू, हूप” म्हणून मोठ्याने ओरडला. त्या जंगलालगतएक दरी होती तींतून कोणी तरी ‘‘हू, हुप असा जबाब दिल्याचे त्याने लगेच ऐकिलें. त्याचे त्याला आश्चर्य वाटून त्यानें “तू कोण आहेस??? असा प्रश्न केला. आणि त्याचाच * तू कोण आहेस?' असा उलट प्रश्न आला. (* कोण आहेरे मूर्ख मुलगा' असा जगू मोठ्याने पुन्हा ओरडला. आणि त्या दरीतून ६ मूर्ख मुलगा असा प्रतिध्वनि उमटला. यावर जगू फार रागावला आणि मोठ्याने शिव्या देत सुटला. त्या शिव्या प्रतिध्वनीच्या द्वारें जशाच्या तशाच परत आल्या. त्या काल्पनिक मुलाचा सूड उगवावा म्हणून