पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ | एके दिवशीं सदर झांथस याने आपल्या कांहीं स्नेह्यांस जेवावयाला बोलाविले आणि ईसापास सांगितले की, 44 सर्वात उत्तम् अशा पदार्थाचे जेवण तयार कर. ११ मंडळी जेवण्यास बसल्यावर पाहातात तो सर्व पदार्थ जिभांचे केलेले आहेत. झांथसने ६६ असे कां केलें?म्हणून • ईसापास विचारले. तेव्हां ईसाप म्हणाला, ' महाराज, जिभेसारखी उत्तम वस्तु कोणतीच नाहीं. आज जगांत तिच्यापेक्षां उत्तम वस्तु कोणती आहे. तिने आपल्या मधुरपणानें जितक्या गोष्टी केल्या आहेत, तितक्या कोणीसुद्धा केल्या नसतील. सत्कार्य करण्यास प्रवृत्त करणारी परमेश्वराचे व सज्जनांचे गुण वर्णन करणारी तीच. सारांशसर्व वस्तूंत तीच उत्तम शिवाय सगळ्यांत उत्तम वस्तूचे जेवण कर म्हणून आपण आज्ञा केली होती. म्हणून तिचेच सर्व पदार्थ तयार केले. " | ते ऐकून झांथसनें, ६ बरे तर उद्या सगळ्या जगांत दुष्ट व अधम अशा वस्तूंचे जेवण तयार कर' असा हुकूम त्यास केला. पण दुसरे दिवशीं पाहातो,तों, पुनः सर्व पदार्थ जिभांचेच. | 5 अरे हॅरे काय? असे त्या धन्याने, ईसापास विचारले. त्यावर ईसापाने उत्तर दिले, * धनीसाहेब, सगळ्या वस्तूंत जीभ ही अधम आहे. जगांतली भांडणे,तंटे, गुन्हे या सगळ्यांचे मूळ या आपल्या जिभेतच आहे. हिने जितक्या आगी लावल्या आहेत तितक्या दुस-या कोणी लावल्या नसतील; तेव्हां जीभ ही जशी श्रेष्ठ व उत्तम तशीच ती दुष्ट व अधम आहे.