४०. रची बडबड करण्याची ज्याला संवय आहे, त्याला अनेक अडचणी व त्रास उप्तन्न होतात. ज्याला उद्देशून ती बडबड असेल, त्याच्या मनांत तर त्वेष उसन्न होतो व प्रसंगविशेष त्या दोघांत कलह माजतो व पूर्वीची थोडीशी सहज नाहीं शी होण्यासारखी चुरस असली तरी ती अशा बडबडण्याने विनाकारण वाढते. | यासाठी प्रत्येकानें निरंतर गोड माघण करावे, अभद्र भाषणानें कोणी आपली जीभ विटाळू नये. ईश्वराने आपणास जी सोन्यासारखी वाचा दिली आहे, ती कठोर भाषण करण्यास किंवा अपशब्द उच्चारावयास दिलेली नाही. तर ती ऐकणारास आनंद होईल व बोलणाराची मनोवृत्ति प्रफुल्लित राहील असे मधुर, रुचकर आणि गोड भाषण करण्याकरितांच दिलेली आहे. श्लोक प्रसवति बहुकामा घालवी दुर्दशेसी ॥ उपजवुनि सुकीत दुष्कृतातें विनाशी ।। सतत सदय माता मंगलाचीच मानू ॥ सुकवि वदति वाचा सुनृता कामधेनू ॥ परशरामपंत गोडबोले जीभ ही जशी श्रेष्ठ तशीच ती दुष्ट आहे! -95झांथस नांवाचा एक तत्त्ववेत्ता होता. तो मोठा गुणग्राही होता. त्याने ईसापास गुलाम म्हणून विकत घेतले होते.
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/48
Appearance