पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ आणि जर ती स्वाधीन नसली तर सर्वांचे मनांत आपलेविषयों द्वेष उत्पन्न करील. तिचा शहाणपणाने उपयोग केला तर ती प्राणसुद्धां वाचविते. व मूर्खपणाने तिचा उपयोग केला तर ती प्रसंगविशेष प्राणघातकही होते. ज्याने जीभ स्वाधीन ठेविली त्याने सर्व शरीर स्वाधीन ठेविले म्हणून समजावें, आपण घोड्याच्या तोंडांत लगाम घालतों, यामुळे त्याचे शरीर आपणास पाहिजे तिकडे वळविता येते. त्याप्रमाणे आपण जर आपली जीभ स्वाधीन ठेविली तर, आपणासही आपले शरीर स्वाधीन ठेवतां येईल. - रागाने उत्तर देणे हा वेडेपणा होय. पण एखाद्याची थट्टा करणे हे त्याहीपेक्षां मूर्खपणाचे लक्षण आहे. पुष्कळ लोक एखादी दुखापत सोसतील; पण त्यांना कोणी हंसलेले खपणार नाही. त्यांना दुसरे कांहीं केले तरी ते घटकाभर विसरतील, पण त्यांची टवाळकी केली तर ते त्याचा राग मनांत ठेवतील, | विचार करून जे शब्द येतील तेच बोलावे. वाचाळपणा किंवा कांहीं तरी बोलण्याची ज्याला सवय असते, त्याला बहुधा आपल्या कामांत यश येत नाहीं. पुष्कळ लोक बोलण्याच्या भरांत जे मनांत असते त्याहून भलतेच कांहीं तरी बोलून जातात. व मागाहून त्यांना असे वाटते की, असे आपण बोललो नसतो तर फार बरे झाले असते, कित्येक कांहीं तरी गैरशिस्त गोष्ट बोलतात. ती बोलण्यांत त्यांचा कांहीं विशेष हेतु असते असे नाही; पण त्यांच्या जिभेला कांहीं तरी चाळा करावासा वाटतो. अशा प्रका