Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। । । ३७ यीं खबरदारी घ्यावी. दुस-यांची व्यंगे बाहेर काढून त्यांची चिकित्सा करीत बसणे फारच अनर्थकारक आहे. दुस-या- च्या वाईट खोडी असल्या तरी त्या बाहेर काढण्याचा कोणालाही अधिकार नाहीं. | बोलतांना पदोपदी शपथा घेण्याची संवय सोडून द्यावी. बोलण्यांत देवाची खोटी शपथ वाहणे म्हणजे देवाचा मोठा अपमान केल्यासारखे आहे. खोटी शपथ वाहणें हें नीच कर्म आहे. खोटें भाषण करू नये. तेणेकरून मनुष्याचे मोल जाते. खोटेपणाचा परिणाम खोटाच होतो. वाणाचे खरें भूषण सत्य बोलणे हेच होय. तेच वाणीला भूषविते. गूळ नाही, पण गुळासारखी गोड वाचा तरी मनुष्याने ठेवावी. गोड बोलण्याने मनुष्य तर वश होतोच; पण त्याने मुके प्राणी सुद्धा वश होतात. कठोरपणापेक्षां प्रनळपणाने मोठे काम होते. सात्विक मनुष्ये मिष्टान्नापेक्षां गोड शब्दांचाच भुकेलेली असतात. सभ्यपणाने बोलण्याने मनुष्याची योग्यता वाढते. चांगली वाणी ही भाग्यश्री वाढविणारी आहे. गोड व सत्य वाणी में मनुष्याचे सौंदर्य आहे. गोड व सत्य वाणीनें जीवित दिव्य व रमणीय होते. . आपण जसे शब्द उच्चारावे तसेच त्याचे उत्तर दुसरयाकडून मिळत असते. आपण प्रेमाचे शब्द उच्चारले तर आपणासही प्रेमाचेच शब्द ऐकावयास मिळतात. आपण रागाने किंवा उद्दामपणाने भाषण केले तर त्याचा जवाब तशाच भाषणांत मिळतो. * अरे तर ६ कारे असा सर्व साधारण जगाचा नियम आहे. कारण, मनुप्याचेच