३६. (५) वाणीचा सदुपयोग E बहु काळींचा मित्रसंबंधु ॥ तोडी एक वोखटा शव्दु । जैसा कांजचा स्वल्पबिंदु । घटची नाशी । दुग्धाचा ॥ वाणी ही अमोलिक देणगी कृपाळु परमेश्वराने मनुप्यास दिली आहे. तिचा चांगला किंवा वाईट उपयोग करणे हे मात्र त्याच दयाघन परमेश्वराने मनुष्याच्या हाती ठेविले आहे. तिचा जर आपण सदुपयोग केला तरी ती सन्मित्राप्रमाणें सुखदायक होते, आणि दुरुपयोग केला तर ती शत्रूप्रमाणे हानिकारक होते. विचार न करितां वेडेवांकडे बोलण्यांत जीभ लांब केली तर विनाकारण मोठमोठाले अनर्थ ओढवतात. यासाठी वाणीचा उपयोग सुखकारक व हितकारक होईल असा करीत जावा. वायफळ पुष्कळ बोलण्याची संवय ठेवू नये. फार बोलण्याने शब्दाचे महत्त्व नाहीसे होते, व चुका होण्याचा संभव असतो. गोड बाणाने सत्य भाषण करण्याची सवय ठेवावी. फाजील थट्टा केल्याने मोठमोठे अनर्थ ओढवतात. थट्टेखोर भाषण हे दुस-यास मान खाली घालावयास लावते. दुसन्याच्या खाडी व दुर्गुण वर्णन केल्याने त्यास राग व त्वेष ही उत्पन्न होतात. दुस-याच्या मनाला लागेल अशी त्याची थट्टा करणे हे फारच वाईट व सभ्यपणाला हानिकारक आहे. बोलतांना निदास्पद शब्द न उच्चारण्याविष
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/44
Appearance