पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५ धिप्पाड वडाचे झाड, जमिनीवर उलथून पडलें आहे ते? आणि हे इकडे ओढ्याच्या बाजूस निजिव व लेचेपेचे लव्हाळे जसेच्या तसेच ताठ उभे आहेत. प्रत्येक वावटळीस न जुमानणाच्या ह्या प्रौढ वटवृक्षांपेक्षा लव्हाळ्यांचाच या वा-याने विशेष स्वल्प रीतीने नाश केला असेल असेच मला वाटले होते. ' बाप म्हणाला, ४ मुला हा दांडगा वड मोडलाच पाहिजे. कारण त्यास वाच्या पुढे वाकवतच नाहीं! परंतु हे लव्हाळे पाहा! वारा आला म्हणजे वाकून जमिनीवर आडवे पडण्यापर्यंतची त्यांची तयारी असते. तेथे वारा त्यास काय त्रास देऊ शकतो ? म्हण आहे, गर्वाचे घर खालीं ! | . .. ...।