पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ उपटून घेऊन येतां, परंतु त्या वेताला घेऊन येत नाहीं. तो फार मोठा नसून त्याचे सामर्थ्यही फार मोठे नाहीं, व तो अगदीं तुमच्या कांठाला वाढतो. त्याला तुच्छ समजून तुम्ही आणीत नाहीं, कां त्याने तुमचें कांहीं केलें आहे म्हणून तो तुमचा कांठ सोडून मजकडे येत नाहीं. तेव्हां सर्वश्रेष्ठ गंगेने त्याला पुढील उत्तर दिले. । ती म्हणाली, “ ही झाडे आपली जागा अगदीं न सोडतां मोठ्या ताठ्याने उभी राहतात. या ताठ्यामुळे त्यांना आम्ही जागा सोडावयाला लावितों; वेताची गोष्ट तशी नाही. आमच्या येणाया जोरापुढे तो नमतो व आमचा जोर निघून गेल्यावर तो आपल्या जाग्यावर पुन्हा आपला कायम राहतो. त्याला वेळ प्रसंग समजतो. तो नेहमीं नम्र असतो. मा-याच्या जोरापुढे जे ताठा न धरतां वाकतात त्यांचा पराभव होत नाहीं. वटवृक्ष आणि लव्हाळा. ऽ गर्विष्ठ, अभिमानी, ताठर होतील ते पडतील, नमून वागतील ते आपला पगडा बसवतील. रात्रीं भयंकर तुफान वावटळ झाल्यानंतरच्या सकाळी, रामचंद्रपंत आपला मुलगा रंगू, यास बरोबर घेऊन, रात्रीच्या वा-याने कांहीं नुकसान झाले आहे की काय, म्हणून पाहण्यासाठी बागांत गेले. रंगू म्हणला, ** बाबा, ते पाहा पलीकडे, केवढे मोठे