Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ पुढे मांडणे, हे होय. दांडगेपणा जसा वाईट तसाच किंवा त्याहून लुब्रेपणा हा वाईट आहे. म्हणून मनुष्याने विनयरूप रम्य उपवनाची शोभा अवलोकन करण्याच्या भरांत लुब्रेपणारूपीं कांटेरी कुंपणांत न पडण्याची खबरदारी ठेवावी. विनयी विद्वान्. प्रसिद्ध लॉर्ड बेकन् हा एकदां आजारी पडला असतां त्यास फ्रान्सचा वकील भेटावयास गेला, व त्याने बेकन्ची अतीच प्रशंसा केली. तो म्हणाला, 4 देवदूत, देवदूत ?” म्हणून कोणी आहेत असे मी आजवर नुसते ऐकतच होतो. पण त्यांच्या दर्शनाचा लाभ आजवर मला कधीं मिळाला नाहीं. तो आज मला मिळाला. कारण आपण त्या कोटींतले आहांत. यावर बेकनचे उत्तर त्याच्यासारख्या तत्त्ववेत्त्यास शोभण्यासारखेच होते. तो म्हणाला ** लोक मला देवदूत म्हणतील तर खुशाल म्हणोत. पण माझा दोघ व शारीरिक पीडा मला ** तू मनुष्य आहेस, असे अगदी स्पष्टपणे सांगतात. नद्या व वेत.

      • समुद्रानें कोणे एके वेळी सर्व नद्यांना विचारलें कीं ६६ मोठमोठ्या धिप्पाड अशा झाडांना, त्यांच्या मुळांसकट