३२ मनुष्य दुष्ट असतो असे नाही. पण त्यास असे वाटते की, आपण मात्र मनास येईल तसे वागावे, आपल्यापासून त्रास झाला तरी लोकांनी तो सोसून घ्यावा, व त्याविरुद्ध लोकांनी ब्रहि काढू नये; पण लोकांच्या दांडगेपणाचा जसा आपणास त्रास येतो, तसा आपल्यादांडगेपणाचा त्यांस त्रास येत असेल, ही गोष्ट त्याच्या स्वप्नही येत नाही, त्याच्याने आपल्या मनास मुळीच आवरता येत नाही. ज्याचे मन अनावर आहे त्यांशी वागणे मोठे कठीण आहे. अशा मनुष्यापासून कोणासही सुख होणार नाही, इतकेच नव्हे, तर उलटा त्याचा त्रास येऊन तो जवळ नसावा असे वाटेल. अंगीं इतर गुण असूनही, एक विनय नसल्यामुळे मनुष्याचा व्हावा तसा नफा होत नाहीं. | कित्येकांस अशी एक वाईट खाड असते की, कोणी कांहीं बोलले तरी त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न करावयाचा ही खोड फार वाईट आहे. या दुष्ट खाडीमुळे असे होते की, मनुष्य आज ज्या गोष्टीचे मंडन करितो, तिचेच उद्यां खंडन करू लागतो. कोणीं कांही म्हटले तरी लाच्या उलट बोलणे जसे वाईट, तसेच कोणी काहीही म्हटले असतां त्यास होय म्हणणे हेही वाईट आहे. नुसत्या होस हो ठोकून दिल्याने मनुष्य विनयशील होत नाहीं. होस हो म्हणणे, व कोणत्याही गोष्टींत आपल्या सदसद्विवेक बुद्धीच्या विरुद्ध मत देणे, हा विनय नव्हे. ह्यास लुब्रेपणा किंवा तोंडपुजेपणा म्हणतात. विनयाची स्वरी रीत म्हटली म्हणजे आपलें जें प्रामाणिक मत झाले असेल तेच नम्रतेने
पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/40
Appearance