पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ विद्येचा सुपरिणाम झालेला आहे. जरी अंगी मोठी विद्या व पदरीं मोठी धनदौलत असली तरी जर अंगीं विनय नसेल तर दोन्हीही कवडी मोल होत. याकरितां विद्वत्ता व संपत्ति याप्रमाणे विनयही संपादन करण्याकरितां प्रत्येकानें झटले पाहिजे. विनयामुळे मनुष्याचे गुण दुस-याचे मनांत तेव्हांच भरतात. म्हणून विनय हा एक शहाणपणाचा भाग समजतात. अंग खरा विनय व सभ्यपणा नसतां केवळ बाहेरून वस्त्रप्रावणीची व पोषाकाची ठाकठिकी करून व बोलण्याचालण्यांत सभ्यपणाची ऐट आणणे केवळ व्यर्थ आहे. मनाच्या कोमलपणाशिवाय शरिराचा चांगुलपणा हा सुगंधरहीत फुलासारखा होय. खरा विनय व प्रामाणिकपणा यांचा अगदीं निकट संबंध आहे. प्रामाणिकपणाशिवाय नुसती नम्रता किंवा विनय हीं मुलाम्यासारखी आहेत. त्यास खच्या सोन्याची शोभा किंवा किंमत यावयाची नाही. खरा विनय व दया ही एकमेकांपासून फार दूर नाहींत. दुस-याचे अंतःकरण तिलप्रायही न दुखावण हे तर विनयशीलपणाचें मूळ लक्षण आहे. आपण लोकांशीं नम्रतेने व सभ्यपणाने वागलों तरच लोक आपणांशी तसे वागतील. | विनयी मनुष्य आपल्या ख-या मोठेपणाचाही डौल मिर* वात नाहीं. पण छचोर मनुष्य सर्व गोष्टींत आपलीच बढाई मारीत असतो. नम्र मनुष्य चांगली गोष्ट बिनबोभाट करितो, पण छचोर मनुष्य कांहींही न करितां नुसती बडबड मात्र पोकळ ढगासारखी करिता. दांडगा