पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| विनयी व सभ्य मनुष्याची, संगति लोकांस प्रिय व सुखावह होते. कित्येकांस विनयाचे मोठेसे माहात्म्य वाटत नाहीं. पण सदाचरण देखील विनयशील नसेल तर ते शोभत नाहीं. विनयाने मनुष्याचे वजन, लोकांत वाढते. दुसरे पुष्कळ गुण अंगी असून जर विनय म्ह ० नम्रता अंगी नसेल तर सदर गुणांचे व्हावे तसे चीज होत नाहीं. बोलण्या चालण्याच्या रितीभातींवरून दुस-याच्या मनांत जो ग्रह प्रथम उत्पन्न होतो तो सहसा जात नाहीं. विनय व सभ्यपणा अंगी असल्यास हा ग्रह चांगला होता. मनुप्याच्या अंगी दांडगेपणा व आचरटपणा असला म्हणजे, त्यानें कोणाचे नुकसान केले नाहीं तरी लोकांस त्याचा त्रास येतो. सभ्य अथवा विनयशील मनुष्यापासून कांहीं लाभ नसला तरी तो लोकांस फार आवडतो. त्रासिक व दांडगा मनुष्य मनाचा कोमल असला तरी तो लोकांस नकोसा वाटतो.. विनय ही एक सदाचरणाची खूण आहे. त्यावरून मनुप्याचे विचार, आवड, स्वभाव व संगति यांचे बरेच ज्ञान होते. लुच्चगिरीने मुद्दाम खोटा विनय धरतात तो वेगळा. पण सुशिक्षणाने वाढलेला स्वाभाविक सभ्यपणा हा थोर मनुप्याच्या योग्यतेचे चिन्ह होय. मन सुसंस्कृत झाल्याखेरीज खरा विनय सहसा उत्पन्न होत नाही. यावरून ** विद्या ददाति विनयं म्हणजे विद्येने विनय प्राप्त होतो, अशा अर्थाचे संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, ते या गोष्टीची सत्यता पटविते. यावरून आणखी असे सिद्ध होते की, ज्याच्या अंगीं विनय आहे त्याच्याच मनावर