पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) विनय.... भो नारायण, सुप्तुं शोभसे विनयेन । -डॉक्टर भांडारकरभावार्थः—हे नारायणा तू विनयामुळे चांगला शोभतोस. मनुष्याचे भूषण विद्या, आणि विद्यचे भूषण विनय होय. फूल स्वतः शोभायमान पदार्थ खरा, पण त्यास सुगंधाने जशी अधिक योग्यता येते, तसा विधेस विनयाने अधिक थोरपणा येते, विनयामुळे सर्व दोष झांकले जाऊन गुण तेवढेच लोकांस दिसू लागतात. जो मनुष्य पुढे पुढे करून आपल्या गुणांचे प्रदर्शन न करितां, विनयाच्या झिरझिरीत पडत्यांतून ते प्रकट करतो त्याचेच गुण अधिक शोभायमान दिसतात. कमलादिक फुले पूर्ण विकास पावण्यापूर्वी जशी खुलून दिसतात तशी पर्ण विकास पावल्यावर ती दिसत नाहीत. म्हणून विनय हा मनुष्याच्या सद्गुणरूपी अलंकारांतील बहुमोल हिराच आहे अ म्हणण्यास हरकत नाही. कुरूप मनुष्यही अलंकाराने थोडासा शोभिवंत दिसतो; त्याप्रमाणे वाईट मनुष्याससुद्धां विनयामुळे थोडासा मान मिळतो. मनुष्य सुस्वरूप असूनही वाईट साईट कपडे वापरणारा व वेडावांडा पोषाक करणारा असला म्हणजे त्याचा सहवास सुखकर होत नाही. त्याप्रमाणे मनुष्य विद्वान असूनही उद्धट असला तर त्याची संगति नकोशी वाटते. कोणतेही कृत्य विनयाने केले असतां ते अधिक शोभते.