पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ लाड बेकन् याचे विद्येसंबंधी म्हणे.

  • लॉर्ड बेकन् या नावाचा एक मोठा ग्रंथकार सतरावे शतकांत इंग्लंड देशांत होऊन गेला. अनेक कारणांनी त्याचे मन व्यग्र झाले असतांही त्याने आपला अभ्यास कधीही सोडला नाहीं. ऐन मानसिक दुःखांत व प्रापंचिक संकटांत तो अगदी बुडून गेला असता त्याने इंग्लंडचा इतिहास, इंग्लंडच्या कायदेकानूची व्यवस्था, व तत्वज्ञ कारस्थानी हे ग्रंथ लिहून ते तडीस नेले, त्याने विद्येसंबध एके ठिकाणी लिहिले आहे कीं:- | 4 विद्या ही विश्रांतीकरितां मंचक, निवांत एकटें फिरण्याकरितां मठ, उंच उभे राहून दुसन्यास तुच्छ मानण्याकरितां बुरूज, दुस-याशी युद्ध करण्याकरितां किल्ला, अथवा व्यापार धंद्याचे व किफायतीचे दुकान, अशी नसावी ! तर जेणे करून आपली मानसिक उन्नति होईल व परमेश्वराचे वैभव जगतांत गाजेल अशा साधनांचे विद्या. हे भांडार असावें. !